चिखली कुदळवाडी अतिक्रमण

चिखली कुदळवाडी अतिक्रमण 

Chikhali Kudalwadi Atikraman


 पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड मधील चिखली कुदळवाडी मद्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं. हे अतिक्रमण आजपर्यंत म्हणजे संपूर्ण देशातील सर्वात मोठं अतिक्रमण करण्यात आलं. येथील उद्दोगधंदे, भंगाराची दुकाने, प्लॅस्टिकची दुकाने, हार्डवेरची दुकाने व  इतर दुकाने ही गेली ३०-४० वर्षा पासून होती. परंतु ही अतिक्रमण कारवाई का करण्यात अली. तर आजूबाजूला मोठया प्रमाणात राहवासी जागा आहे. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात ट्रॉफिक ची समस्या होत होती. आणि जास्तीत-जास्त भंगाराची दुकाने तसेच प्लॅस्टिकची दुकाने असल्यामुळे स्थानिक लोकांना मोठा त्रास होत होता.

१०-१५ वर्षामद्ये खूप वेळा भंगाराच्या दुकानांना आग लागल्यामुळे येथील जण-जीवनाला तसेच पर्यावरणाला मोठी हानी होऊ लागली. एक दुकान जळाले तर आजूबाजूची १५ ते २० दुकाने जाळून खाक होत होती. त्यामुळे ही आग वीजवण्या करता अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागत असे. परंतु ही कारवाई इतेच केली असं नाही, संपूर्ण भारतामद्ये अशीच कारवाई चालू आहे. पण चिखली कुदळवाडीची कारवाई ही भारतातली सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई आहे. कारण येथे चार ते पाच हजार दुकाने तसेच छोटी मोठी इतर दुकाने आहे. त्यामुळे ही कारवाई मोठी होती. 






Comments

Popular posts from this blog

कार्ला लेणी, लोणावळा पुणे

खार (खारुताई) squirrel

F1 ते F12 की चे काम Shortcut Key F1 to F12