खार (खारुताई) squirrel

 खार (खारुताई) squirrel

Squirrel information in Marathi 


नमस्कार,
माझ्या आणि तुमच्या घराच्या तसेच आजूबाजूला झाडावरती किव्हा शेतात मद्ये खारुताई दिसत असेल. मी आणि तुम्ही लहान असताना घरच्यांनी खारुताईची गोष्ट सांगितली असेल. खार ही आकाराने छोटी आहे. खारुताई बद्दल सांगायचं झालं तर हा प्राणी अतिशय संवेदनशील आहे. जरा काही धोका वाटला तर लगेच हालचाल करते. ती एका जागी कित्तेक वेळ बसू शकते नाहीतर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लगेच निघून जाते. जर एखाद झाड किव्हा एखाद ठिकाण आवडलं तर कित्तेक वर्ष त्याच ठिकाणी राहते. तिची गम्मत सांगायची सांगायची झालं तर ती कधी कधी स्वताच्या शेपटी बरोबर खेळत असते. ज्या झाडांना फुले येतात त्या झाडांवरती ती जास्त प्रमाणात आढळून येते. उदा. कडू लिंबाचं झाड, शेवगा, आंबा, उंबर इ. 

खारुताईचा रंग राखाडी असतो. तस पहिले तर खारीच्या जगभरामद्ये विविध प्रजाती आढळून येतात. काही ठिकाणी तर उडणाऱ्या खारी आहे. खार मुख्य तीन प्रकारामध्ये आढळून येते झाडावरील खार, जमिनीवरील खार आणि उडणाऱ्या खरी. माघचे दोन्ही पाय मजबूत असून पुढच्या दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटे असतात. तर मागच्या पायांना पाच बोटे असतात. शेपटी लांब व झुपकेदार असती आणि धावताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी होतो. तसेच थंडीच्या दिवसामद्ये शरीराला झाकण्यासाठी करतात. पुढचे दात धारदार मजबूत असतात, कठीण कवचाची फळे तोडू शकतात. जर त्यांना आजूबाजूला धोका आढळला तर मोठ-मोठ्याने आवाज करतात. 

भारतात खारीच्या मुख्य दोन जाती आढळत. पहिली जात माणसांच्या सहवासात तसेच घराभोवती दिसून येते. शेतामद्ये तसेच शहरी भागामद्ये सुद्धा मोठया प्रमाणात आढळून येते. या खारीच्या पाठीवर पाच पट्टे असतात म्हणून तिला पाच पट्ट्याची खार म्हणतात. दुसरी जात फ्युनॅब्युलस पामेरम जंगलात राहणारी आहे. तिच्या पाठीवर तीन पट्टे असतात. म्हणून तिला तीन पट्ट्याची खार तसेच श्री प्रभू रामाची खार म्हणतात. सामान्य खारीची लांबी १३-१५ सेंमी असते. शरीराचा रंग करडा तपकिरी असेच राखाडी असतो. अंगावरचे केस मऊ व दाट असतात. खरी जास्तीत जास्त १० ते  १२ जगतात. 

या खारी अतिशय हुशार आणि चलाख असतात. त्या स्व:त्ताच अन्न स्वतःच शोधून खातात आणि काही वेळेस ते जमिनी मद्ये पुरतात जेणेकरून पुढच्या दिवसामद्ये पुन्ना खायला मिळेल. यामुळे वनसववर्धनाला चालना मिळते. जेव्हा मी फोटोग्राफी सुरु केली तेव्हा मला या खारीच्या सहवासात राहायला आवडू लागलं. लहान असल्यापासून या खारींना पाहत आलेलो आहे. या खरी अतिशय मेहनती असतात. त्या कोणालाही त्रास देत नाही. त्या आपल्याच कामामद्ये वेस्त असतात. 

तुम्ही हा Blog जर वाचला असेल तर नक्कीच तुमच्या आजूबाजूच्या खारींच निरीक्षण व गमतीजमती पहा. धंन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

कार्ला लेणी, लोणावळा पुणे

F1 ते F12 की चे काम Shortcut Key F1 to F12