कार्ला लेणी, लोणावळा पुणे

 कार्ला लेणी, लोणावळा 

Karla Caves, Lonavala 

Karla Caves Information in Marathi 




नमस्कार, 
मी राहुल जेव्हा मी कार्ला लेणीला भेट दिली तेव्हा मला एक अविस्मरणीय अनुभव आला. कारण ते स्थळ एक अति प्राचीन ऐतिहासिक स्थळ होते. कारण या लेण्या सम्राट अशोक यांच्या काळातील आहे. या लेण्यांमधील कोरलेल्या वास्तू अचंबित करणाऱ्या होत्या. जेव्हा मी या लेण्यांविषयी इंटरनेट वर वाचले तेव्हा खूप माहिती समजली. या लेणीचे नाव प्राचीन काळी 'वलुरक' होते. कालांतराने विविध राजवटी नंतर आत्ता 'कार्ला' हे नाव पडले आहे.या लेणी १६ बौद्ध लेणी गटामध्ये विभागलेली आहे. येथील चैत्यगृह अतिशय सुंदर आहे. असे सांगितलं जाते की हे ठिकाण प्राचीन बोरघाट सातवाहन कालीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून तेर या ठिकाण्यास जाण्याच्या मार्गावर आहे. या कार्ला लेण्यामद्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहे असे दिसून येते.

या मद्ये एक चैत्यगृह आणि काही विहारे आहे. चैत्यगृहाच्या दाराशेजारी डाव्या बाजूला सिंहस्तंभ कोरलेला आहे. आजही तो जसा होता तसाच आहे. या सिंहस्तंभाला पाहिल्याववर असे वाटतेकी आपले पूर्वज कला कृती मद्ये किती महान होते. असेच सिंहस्तंभ सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आले होते. या स्तंभावर तिन्ही बाजूला तीन सिंह आहे. मुख्य लेण्याच्या समोरच श्री एकविरा देवीचं मंदिर आहे. या मंदिराला आणि लेण्यांना दरोरोज हजारो पर्यटक भेट देतात. हा स्तंभ ४५ फुटांचा आहे. याची रचना वर्तुळाकार आणि अंग सोळाकोनामंध्ये आहे. स्तंभाच्या बाजूला सुद्धा एक वास्तू आहे पण ती आत्ता वेवस्तीत नाही. आत मद्ये गेल्यावर दोन्ही बाजूंनी खूप खांब दिसतात आणि खांबावरती विविध शिल्पे कोरलेली दिसून येतात. 

ही शिल्पे अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आहे. जणू काही हि शिल्पे आपल्याला काही तरी सांगत आहे. आणि खांबावरती विविध लेख सुद्धा कोरलेले आहे. आणि वरती लाकडाच्या गोलाकार फळ्या लावलेल्या आहे. या खांबावरती श्री-पुरुषांचये शिल्प कोरलेले आहे. श्रीयांनी डोक्यावरती पदर घेतलेला आहे. कपाळावरती कुंकू तसेच पायात विविध प्रकारचे तोडे दिसतात. त्याच भाहेरील बाजूस तीन भलेमोठे हत्ती आहे. तुम्हाला जर प्राचीन शिल्पकला बागायची असेल तर नक्कीच या कार्ला लेणीला भेट द्या. 

या कार्ला लेण्याचे काही Photos 



















Comments

Popular posts from this blog

खार (खारुताई) squirrel

F1 ते F12 की चे काम Shortcut Key F1 to F12