नैराश्य आणि चिंता एक महाभयानक रोग

 



नमस्कार, मी राहुल 

मी आज हा लेख लिहीत आहे. म्हणजेच २०२५ साली आज पर्यंत जेवढी काही माणसे भेटता तेवढी कोणत्याना कोणत्या गोस्टी मुळे चिंतेत असतात. पण ही चिंता तुमचे आयुष्य संपून टाकेन. पण असं का? जेव्हा मी या गोष्टीच्या खोलात गेलो तेव्हा मला समजलं की नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो. वर्तमान परिस्थितीचा विचार करायचं सोडून आपण भविष्याचा जास्त विचार करतो. म्हणून आपण सर्वजण नैराश्याच्या जगामद्ये जगत आहोत. कारण ते भविष्य आपल्या पर्यंत अजून पोहोचलेलं नाही, म्हणजेच ते जीवन आभासी आहे. त्याचा वास्तव्याशी काहीही संभंध नाही. म्हणून नैराश्य स्वतःवर ओढावून घेतो. आत्ता नैराश्य एक महाभयानक रोगा प्रमाणे पसरू लागले आहे. 

नैराश्या बरोबर चिंता ही वाढू लागली आहे. म्हणजेच आता माणसे स्वतःच्या जीवनाचं महत्व ही विसरू लागली आहे. सतत नको त्या वस्तूंचा विचार करायचा आणि ती वस्तू नाही भेटली की सतत चिंता करायची आणि आपलं स्वतःच आयुष्य संपवून टाकायचं. तुम्ही विचार करत असाल की, पूर्वी माणसे कशी काय सुखी जीवन जगत असेल. त्या वेळेस कोणत्याही गोस्टी, वस्तूंची चिंता नव्हती. पण का? कारण त्या काळातली माणसे आहे त्या परीस्तीत, आहे त्या वस्तूंशी, आहे त्या माणसांशी समाधानी होती, म्हणून ती माणसे सुखी, समृद्धी आणि निरोगी जीवन जगत होती. 

पण आजकाल तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामद्ये पाहत असाल की, माणसे नैराश्य आणि चिंते मद्ये अडकलेली आहे. पण यातून ते कधीच सावरू शकत नाही. कारण स्वतःच्या विचाराने कमी आणि दुसऱ्याच्या विचाराने जास्त वागतात. एखादी गोस्ट समोरच्याला शक्य झाली आहे परंतु ती आपल्याला शक्य होईल असं होऊ शकत नाही. म्हणून आपण आपली परिस्तिथी तसेच आपले विचार किती मजबूत आहे हे पाहीले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्याच्या नव्या वाटेकडे प्रवास करू शकाल. आपल्याकडे जी गोस्ट नाही त्या गोष्टींचा अती विचार करणं सोडून द्या. आणि जी गोस्ट आपल्याकडे आहे तिचा योग्य वापर करा. उदा. माझ्याकडे दोन चाकी गाडी आहे आणि शेजाऱ्यांकडे चार चाकी गाडी आहे. आपण असं विचार करतो की असं का? माझ्याकडे का नाही. म्हणून आपण ती मिळवण्या करिता धडपड करतो. पण त्या चार चाकी गाडी करिता आपण आपल्या दोन चाकी गाडी कडे दुर्लक्ष करतो. आणि आहे ती पण गमावून बसतो.

असे करता करता आयुष्य संपून जाते. आणि सतत नैराश्य आणि चिंता येते. त्यामुळे तुमचे विचार, तुमची स्मरण शक्ती, तुमचं शरीर कमजोर होतं. आणि एक दिवस सर्व संपून जातं. आणि त्याच बरोबर आपण आपल्या कुटुंबाला सुद्धा संपवतो. आणि आजकाल काही ना काही मिळवण्यासाठी कर्ज करून बसतो. कारण त्या गोष्टीची काहीच गरज नसते. ज्यासाठी कर्ज घेतले आहे त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे का नाही ते पाहिलं पाहिजे. आणि ते जर नसेल मग त्या घेतलेल्या कर्जाचा काहीच उपयोग नाही, म्हणून ते कर्ज आज काल लोकांना फेडता येत नाही. आणि त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढले आहे. सर्वांनी जबाबदारी घेयला पाहिजे पण ती विचाराची, अनुभवाची, चांगल्या जीवनाची तेव्हाच तुम्ही तुमचे घेतलेले कर्ज फेडू शकता. आणि या नैराश्याच्या व चिंतेच्या जगातून भाहेर पडू शकता.

तुम्हीच तुमच्या जीवनाचं शिल्पकार आहात. म्हणून दुसऱ्यांच्या बोलण्यांवर, वागण्यांवर विश्वास ठेवू नका. आणि माणसे ओळखायला शिका. जीवन खूप सुंदर आहे. जगण्याचा आनंद घ्या. परत हे जीवन नाही. स्थिर राहायला शिका. गोंधळून जाऊ नका. चांगले विचार करा, नेहमी हासत राहा. आनंदी राहा. आनंदी जगा. स्वतःची काळजी घ्या. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबातला महत्वाचा घटक आहात. स्वतःला समजून घ्या. घरच्यांना समजून घ्या. आणि जगाला सुद्धा समजून घ्या. जेणेकरून नवनवीन संधी समजून येईल. नवीन जीवनाची दारे उघडतीन.

चलातर आत्ता निरोप घेऊ या. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच आनंद होईल. जर तुमचे मित्र, नातेवाईक  किव्वा कोणीही नैराश्य व चिंतेमद्ये असेल तर त्यांना नक्कीच हा लेख वाचायला द्या 

तुमच्या जीवनाची असेंख्य दारे उघडावी या करिता हा लेख तुमच्यासाठी लिहिला. धन्यवाद..!



Comments

Popular posts from this blog

कार्ला लेणी, लोणावळा पुणे

खार (खारुताई) squirrel

F1 ते F12 की चे काम Shortcut Key F1 to F12